धक्कादायक! नाजूक प्रकरणातून पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -गावातील महिलेबरोबर असलेल्या आपल्या विवाहबाह्य संबंधाचा व्हिडिओ पाहिल्याचा राग आल्याने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे रविवारी घडली. स्वाती शंकर दुर्गे (22) असे या विवाहितेचे नाव असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती शंकर पाराजी दुर्गे, सासू चंद्रकला दुर्गे व कांचन संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. गंभीर भाजलेल्या स्वातीच्या जबाबावरून सोनई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेटवून दिल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. स्वातीने जबाबात म्हटले आहे की, "पती शंकर याचे गावातील एका महिलेश विवाहबाह्य संबंध होते. त्याचा व्हिडिओ त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ पाहिल्याचा राग आल्याने शंकर याने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले." तसेच, सासू चंद्रकला व कांचन गायकवाड यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचेही स्वातीने जबाबात म्हटले आहे. सोनई पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post