गॅस टाकीचा स्फोट होऊन आनंदभुवनला आग


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- हॉटेलच्या आतील बाजुस असलेल्या किचनरुममध्ये शॉर्टसर्किट होऊन गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. या आगीत हॉटेलमधील सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे फर्निचर व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना सोमवारी (दि.24) सकाळी पटवर्धन चौकातील हॉटेल आनंदभूवन येथे घडली.

पटवर्धन चौकातील हॉटेल आनंदभूवनच्या काऊंटरच्या पाठीमागील बाजुस असलेल्या किचन रुममध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने गॅसच्या टाकीचा स्फोट झाला व क्षणात आगीने भीषण रुप धारण केले. यावेळी किचनरुमलगत असलेल्या ग्राहक बसण्याच्या आतील रुममध्ये काही ग्राहक बसलेले होते. आग लागताच ते ताबडतोब बाहेर पडल्याने अनर्थ टळला. या आगीत हॉटेल मधील टेबल, प्लॅस्टिक खुर्च्या, ड्रम तसेच आतील इलेक्ट्रीक वायरी जळाल्या. आग लागताच आजुबाजुच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती अग्नीशमन पथकास दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्नीशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. यावेळी अग्नीशमनदलाचे प्रमुख शंकर मिसाळ, चालक जाकीर रंगारी, भरत पडगे, नाना सोलट, राजू कांडेकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post