स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनच्यावतीने नगरमध्ये अभिवादन


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - बाळासाहेब ठाकरे हे समस्त हिंदू समाजाचे हिंदूहृदय सम्राट होते. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मराठी अस्मिता जागृत करुन मराठी माणसाला मानाचे स्थान मिळवून दिले. शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. सर्वात जास्त काळ मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी शिवसैनिकाची मोठी फळी तयार करुन तळगाळातील लोकांना मानाचे स्थान मिळवून दिले, असे प्रतिपादन माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे शिवसेनच्यावतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, गणेश कवडे, सुरेखा कदम, रोहिणी शेंडगे, पुष्पा बोरुडे, अनिल बोरुडे, संग्राम शेळके, सागर गायकवाड, श्याम नळकांडे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, दिपक खैरे, संग्राम कोतकर, बबलु शिंदे, हर्षवर्धन कोतकर, रमेश परतानी, दत्ता सप्रे, दिपक कावळे, बंट्टी खैरे, हर्षल म्हस्के, प्रविण बेद्रे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अंबादास पंधाडे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत होते. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आत्मसन्मान जागृत करुन मानाचे स्थान मिळवून दिले. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढून त्यांनी त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. कोणत्याही सत्तेची लालसा न बाळगता, गोर-गरीबांचे प्रश्‍न सोडवा हा त्यांचा आदेश होता. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकजण शिवसेनेशी जोडले गेले. सर्वसामान्यांची, सर्वसामान्यांसाठी अशी शिवसेनेची ओळख निर्माण करुन समाजात एक परिवर्तन घडून आणले. आज मराठी माणूस जो ताठमानेने जगतो, ही त्यांचीच देण आहे. आपण त्यांचे हे ऋण कधीही विसरु शकत नाही, असे सांगितले.

याप्रसंगी अनिल शिंदे, गणेश कवडे, संजय शेंडगे, अनिल बोरुडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. माळीवाडा येथे सजावलेल्या स्टेजवर बाळासाहेब ठाकरे यांची मोठी प्रतिमा लावून पूजन करण्यात आले. अनेक नागरिकांनीही यावेळी या थोर नेत्यास अभिवादन केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post