नृसिंह विद्यालयाची सृष्टी शिंदे राज्यात पहिली


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: - महाराष्ट्र राज्य भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत श्री नृसिंग विदयालयातील चास ( ता. नगर ) येथील सृष्टी अशोक शिंदे हिचा राज्यात पहिला क्रंमाक मिळवून उत्तीर्ण झाली.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षासाठी इयत्ता सातवी ते दहावी चे एकूण १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला. विद्यालयातील सृष्टी अशोक शिंदे इयत्ता आठवी १०० पैकी १०० गुण मिळून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक कुमारी जानवी देवकर व प्रतीक आमले या विद्यार्थ्यांना ९८ गुण मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र गोल्ड, सिल्व्हर मेडल व बक्षीस प्राप्त झाले. विद्यालयातील सामाजिक विषय शिक्षिका मंगल साळुंके यांना उपक्रमशील आदर्श भूगोल शिक्षिका पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विद्यालयाच्या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे सचिव खानदेशी विश्वस्त मुकेश मुळे, मुख्याध्यापक चंद्रकांत भवर, किसन माने यांनी अभिनंदन केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post