न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा
माय अहमदनगर वेब टीम
मुंबईः न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. बीसीसीआयने वनडे आणि टी-२० या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून वनडे सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त झालेल्या शिखर धवनच्या जागी पृथ्वी शॉला संधी मिळाली आहे. तर टी-२० च्या संघात शिखर धवनच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावर असताना भारतीय संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. टी-२० मालिकेसाठी कर्णधारपद विराट कोहलीकडेच असून, रोहित शर्मा उपकर्णधार असेल. यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आली आहे. २४ जानेवारी रोजी पहिला टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे.
Post a Comment