भारताचा सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडवर दणदणीत विजय
माय अहमदनगर वेब टीम
न्यूझीलंड - वेलिंग्टन येथील चौथ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूजीलंडचा दुसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. पहिल्यांदाच सलग दुसऱ्या टी-20मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळाली. भारताने न्यूजीलंडला 166 धावांचे आव्हान दिले होते मात्र न्यूजीलंडचा संघ 165 धावांपर्यंत मजल मारू शकला. शार्दूलने अखेरच्या षटकात 6 धावा देत सामना टाय राखला. या मालिकेतील हा सलग दुसरा सामना टाय राहिला.
सुपर ओव्हरमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली. त्याने कॉलिन मुनरो आणि टिम शिफर्टला फक्त 13 धावांवर रोखले. भारतासाठी कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहूल फलंदाजीसाठी मैदानावर आले. राहुल एक षटकार आणि एक चौकार फटकावून बाद झाला. यानंतर विराटने सॅमसनच्या मदतीने लक्ष्य पूर्ण केले.
Post a Comment