महापालिकेच्या स्थायी समितीतून 8 सदस्य निवृत्त
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – महापालिकेच्या स्थायी समितीतील 16 पैकी निवृत्त होणार्या 8 सदस्यांची नावे शुक्रवारी (दि.31) सकाळी चिठ्ठ्या टाकुन निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये शिवसेनेचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, काँग्रेसचा 1 आणि भाजपाच्या 1 सदस्याचा समावेश आहे.
शिवसेनेच्या विद्या खैरे, गणेश कवडे, अमोल येवले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपाली बारस्कर, शोभा बोरकर, अविनाश घुले, काँग्रेसच्या संध्या पवार व भाजपाचे मनोज कोतकर हे चिठ्ठीद्वारे निवृत्त झाले आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीतील 16 सदस्यांपैकी निवृत्त झालेल्या या 8 सदस्यांच्या जागेवर त्यांच्याच पक्षातील इतर सदस्यांची निवड लवकरच केली जाणार आहे.
स्थायी समिती सभापती मुद्दस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्त होणार्या 8 सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी विशेष सभा सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेत महापालिका शाळेतील राजश्री सोनवणे व प्रतिक्षा भालेराव या इ. 4 थी तील मुलींच्या हस्ते या चिठ्ठया काढण्यात आल्या. यावेळी उपायुक्त प्रदीप पठारे, सुनील पवार, प्रभारी नगरसचिव एस.बी. तडवी यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य सुभाष लोंढे, सोनाली चितळे, सुवर्णा जाधव, अविनाश घुले, योगीराज गाडे, कुमार वाकळे, आशा कराळे, गणेश भोसले, गणेश कवडे, संध्या पवार, दीपाली बारस्कर, शोभा बोरकर, विद्या खैरे, अमोल येवले, मनोज कोतकर आदी उपस्थित होते.
Post a Comment