आमदार निलेश लंके यांचा मंगळवारी अहमदनगरमध्ये जनता दरबार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांनी जनतेच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवण्यासाठी मंगळवार दि ७ जानेवारी रोजी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. अशा स्वरूपाचा जनता दरबार पारनेर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी पारनेर मध्ये घेण्यात आला होता त्यात अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली त्यावेळी शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नगर तालुक्यातील जनतेच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवण्यासाठी हा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी महसूल सह शासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांना हजर राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.
पारनेर मतदार संघाला जोडलेल्या ४२ गावातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन आपले प्रश्न मांडावेत.त्या प्रश्नांची जागेवर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.मंगळवार दि.७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता द्वारका लॉन नगर कल्याण रोड या ठिकाणी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून जनतेने योग्य कागदपत्रे घेऊन या ठिकाणी यावे असे आवाहन आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment