पुढील ५० वर्षांचा विचार करुन उपनगर भागात विकासकामे सुरु - महापौर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहराचे विकासकामातून रुप बदलावे यासाठी विकास आराखडा तयार केला आहे. सावेडी उपनगरातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता आकाशवाणी ते कुष्ठधाम रस्ता, भिस्तबाग चौक ते महालापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हा रस्ता नगर शहरातील मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करुन विकासकामे करणार आहे. सर्वच पक्षाचे नगरसेवक विकासकामासाठी सहकार्य करीत आहे. प्रोफेसर चौकातील नाट्यसंकुलाच्या कामालाही गती मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

महापालिकेच्या प्रभाग क्र. ५ मधील वैदूवाडी परिसरामध्ये बंद पाईप कामाचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. यावेळी नगरसेविका आशाताई कराळे, सोनाबाई शिंदे, नगरसेवक मनोज दुलम, भैय्या गंधे, माजी नगरसेवक तायगा शिंदे, सतिश शिंदे, महेश कराळे, डॉ. शरद सुंबे, केतन साठे, बाबाजी शिंदे, दुर्गा शिंदे, पुष्कर कुलकर्णी, आनंद पुंड आदींसह नागरिक उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक तायगा शिंदे म्हणाले की, प्रभागातील विकासकामे दर्जेदार व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रभागातील जमिनी अंतर्गत सर्व कामे मार्गी लावणार आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत. स्वच्छ, सुंदर व हरित प्रभाग करण्यासाठी आम्ही सर्व जण कामाला लागलो आहे. प्रभाग पाच मधील नागरिकांमध्ये तसेच घरोघरी जावून विकासाचे प्रश्न समजून घेऊन विकासकामे केली जाणार आहे. वैदूवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटावा म्हणून सर्वत्र परिसरामध्ये बंद पाईप गटार काम हाती घेतले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post