अहमदनगर शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे - आ.संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- विकासकामाबरोबर प्रत्येकाने सामाजिक भावनेतून स्वच्छतेचा उपक्रम यशस्वी करावा. आपल्यासमोर स्वच्छता, पर्यावरण व प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. विकासाचे प्रश्न सोडविण्याचे काम तर होणारच आहे. पण प्रत्येक नागरिकाने सामाजिक भावनेतून या उपक्रमामध्ये भाग घेतला पाहिजेच. स्वच्छ, सुंदर व हरित शहर पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी व प्रदूषणमुक्त नगर शहर राहण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

उपनगरातील नामदेव चौक परिसरातील रस्ता डांबरीकरण व बंद पाईप गटार कामांचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेवक विनित पाऊलबुधे, सुनील त्र्यंबके, संध्या पवार, दीपाली बारस्कर, रुपाली वारे, बाळासाहेब पवार, उषाताई नलवडे, निखिल वारे, बाळासाहेब बारस्कर, संपत नलवडे, महेश तवले, ऍड. युवराज पोटे, शेषराव भुसारी, नवनाथ जरे, सुरेश आठरे, सोमनाथ भोसले, किशोर बोडखे, विवेक गडाख, मनोज भुसारी, गणेश देशमुख, विशाल पालवे, गडाख, शर्मा, पल्लोड, चौधरी, भिसे, खपले, गणेश देवगावकर, दरोडे, सरोदे, पठारे, ठोंबरे, आदी उपस्थित होते.

आ. जगताप पुढे म्हणाले की, नगर शहरातील अनेक प्रभागातील अनेक पक्षातील नगरसेवक व माजी नगरसेवक एकत्र येवून प्रभागातील विकास कामे मार्गी लावत आहे. सर्वांच्या सहकार्याने नगर शहर आता महानगरामध्ये वाटचाल कणार आहे. राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजना नगर शहरामध्ये राबविणार आहे. शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत घेऊन जाणार आहे. शहरातील रस्त्याचे प्रश्न मोठे आहे यासाठी शासनाकडून मोठा निधीची मागणी करणार आहे. पुढील 50 वर्षाच्या विचार करुन विकासकामे करणार आहे यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकताआहे.

विकासकामे करीत असताना विकासकामांमध्ये कोणीही पक्षीय राजकारण आणू नये. सर्वांनी एकत्र येवून नगर शरामध्ये विकासाचा अजंडा राबवावा. प्रभागातील नगरसेवक जागरुक असल्यास प्रभागाचा विकास निश्चित होतो. तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे प्रभागातील विकासकामे मार्गी लागतात. असेही ते म्हणाले. आभार संपत नलवडे यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post