शालेय राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अनेक राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग


अटीतटीचे सामने जिंकण्यासाठी खेळाडूंचा प्रयत्नांची पराकाष्टा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - गुरुवारपासून नगरच्या वाडीयापार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये ६५ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धा रंगल्या आहेत. अनेक राष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत सहभगी झालेत. अटीतटीचे सामने जिंकण्यासाठी खेळाडू प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या दिवशी झालेल्या ग्रुप सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या व मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. आज मुला-मुलींच्या सिंगल डबल सामने होत आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत झालेल्या ग्रुप मॅचेसमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने तीन पैकी तीन सामने जिंकून सहा गुण पटकावली आहेत तर मुलींच्या संघ दोन पैकी दोन्ही सामने जिंकून चार गुण पटकावले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन होत असल्याने खेळाडूंना चांगल्या सोई मिळत आहेत. 


शुक्रवारी झालेले सामन्याचा निकाल पुढीलप्रमाणे तामिळनाडू (मुली विजयी २-१)विरुद्ध हिमाचल प्रेदेश, चंदिगड (मुली विजयी ३-०) विरुद्ध झारखंड, विद्याभारती (मुले विजयी ३-०) विरुद्ध गोवा, केरळ विरुद्ध गुजरात (मुली विजयी २-१) झारखंड (मुले विजयी ३-०) विरुद्ध नवोदय विद्यालय, उत्तर प्रदेश विरुद्ध राजस्थान (मुली विजयी ३-०), केंद्रीय विद्यालय (मुली विजयी ३-०) विरुद्ध ओरिसा, महाराष्ट्र (मुले विजयी ३-०) विरुद्ध राजस्थान, तेलंगणा (मुले विजयी ३-०) विरुद्ध दिव दमन, पश्चिम बंगाल (मुले विजयी ३-०) विरुद्ध जम्मू काश्मीर, पंजाब (मुले विजयी ३-०) विरुद्ध ओरिसा, नवोदय विद्यालय विरुद्ध तेलंगणा (मुले विजयी ३-०), तामिळनाडू(मुले विजयी २-१) विरुद्ध हिमाचल प्रदेश, केरळ (मुले विजयी ३-०) विरुद्ध सीबीएससी स्पोर्ट्स क्लब, कर्नाटक (मुली विजयी ३-०) विरुद्ध पश्चिम बंगाल, दिल्ली (मुली विजयी ३-०) विरुद्ध दिव दमन, पंजाब (मुली विजयी ३-०) विरुद्ध गोवा, नवोदय विद्यालय विरुद्ध उत्तर प्रदेश (मुली विजयी ३-०), आसाम (मुली विजयी ) विरुद्ध सीबीएससी स्पोर्ट्स.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post