माजी महापौर संदीप कोतकरला जामीन मंजूर
केडगाव हत्याकांडात जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - केडगाव दुहेरी हत्याकांडाचा गुन्ह्यात माजी महापौर संदीप कोतकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जगताप यांनी हा आदेश दिला.
माजी महापौर संदीप कोतकर हा प्रकरणात लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत अाहे. केडगाव हत्याकांडाच्या दिवशी कोतकर याला वैद्यकीय तपासणीसाठी धुळे येथे नेले होते. धुळे ते नाशिक प्रवासात त्यांना मोबाईल वापरला होता. त्याच्या सूचनेवरून केडगावात दोघांची हत्या झाली, असा आरोप संदीप कोतकर याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. त्याला केडगावच्या गुन्ह्यात वर्ग करून त्याला अटक केली होती. जामिनासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपींच्यावतीने ॲड. विवेक म्हसे व महेश तवले यांनी काम पाहिले, तर सरकारी पक्षाच्यावतीने केदार केसकर यांनी काम पहिले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संदीप कोतकर याला केडगाव हत्याकांडाच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे.
Post a Comment