‘एक देश एक रेशन कार्ड’ देशात लागू
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना १ जूनपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. या योजनेअंतर्गत ग्राहक एका रेशन कार्डाचा वापर देशभरात कोणत्याही ठिकाणी करू शकणार आहे.
यापूर्वी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. रामविलास पासवान यांनी या योजनेचे ऑनलाइन उद्घाटनदेखील केले होते. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास देशभरात ही योजना लागू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली होती.
Post a Comment