हवाबंद पदार्थ आणि घ्यावयाची काळजी!


माय अहमदनगर वेब टीम
सध्या हवाबंद पदार्थांचा वापर वाढत असला तरी त्यांच्या योग्य साठवणीकडे लक्ष द्यायला हवं. आज यासंबंधी काही टिप्स जाणून घेऊयात...
1) हवाबंद पदार्थ खरेदी करताना एक्सपायरी डेट नीट तपासून पहा. विशेषतः दुधाच्या पदार्थांबाबत काळजी घ्या.
2) फुटलेल्या किंवा खराब झालेल्या डब्यातले, बॉक्समधले पदार्थ विकत घेऊ नका.
3) डबाबंद पदार्थामध्ये बॅक्टेरिया शिरू शकत नाहीत. पण पदार्थ उघडताना तुमच्या हातांवरचे जूंत त्यात जाऊ शकतात. त्यामुळे हे पदार्थ साठवण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या.
4) पाकिटं स्वच्छ आणि कोरड्या कात्रीने उघडा. कात्री ओलसर असल्यास पदार्थांमध्ये ओलावा निर्माण होईल. मसाले किंवा पाडर फोडताना ही काळजी घ्यायला हवी. ओलसरपणामुळे मसाले खराब होऊ शकतात.
5) पदार्थ उघडल्यानंतर हवाबंद उब्यात ठेवा. यामुळे ताजेपणा टिकून राहील.
6) डब्यातून पदार्थ काढताना स्वच्छ आणि कोरड्या चमच्याचा वापर करा. ओलसर चमच्यामुळे मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारची पीठं यात गुठळ्या होऊ शकतात.
7) पदार्थ किती दिवसांत संपवायचा याची नोंद पाकिटावर असते. तेवढ्या वेळेत तो संपेल याची काळजी घ्या.
8) पदार्थ कोरड्या आणि थंड हवेत साठवा. दमट वातावरणात पदार्थ साठवल्यास खराब होण्याची शक्यता वाढते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post