बाजार समितीचे पत्रकारिता पुरस्कार दत्ता इंगळे, सुनिल हारदे, ज्ञानदेव गोरे यांना जाहीर



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार आणि सकाळचे तालुका प्रतिनिधी दत्ता इंगळे, नगर तालुका पत्रकार संघाचे विद्यमान उपाध्यक्ष आणि नवा मराठाचे उपसंपादक सुनील हारदे, पुढारीचे पत्रकार ज्ञानदेव गोरे यांना जाहीर झाला असल्याची माहिती सभापती विलासराव शिंदे व उपसभापती सौ.रेश्माताई चोभे यांनी दिली.



या पुरस्काराचे वितरण सोमवारी (दि.६) मराठी पत्रकार दिनी सायंकाळी ५ वाजता बाजार समितीच्या शेतकरी निवास सभागृहात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते व आ. संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. 


नगर तालुक्यातील विविध विकास कामांमध्ये तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकारांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि ते प्रश्न मार्गी लावण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्या आणि ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या या शेतकरी पुत्रांचा बाजार समितीच्या वतीने उचित गौरव व्हावा यासाठी तालुक्याचे नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली या वर्षीपासून बाजार समितीच्या वतीने हा गौरव सोहळा आयोजित करण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी दत्ता इंगळे, सुनिल हारदे व ज्ञानदेव गोरे यांचा सन्मान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास तालुक्यातील सर्व पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती विलास शिंदे , उपसभापती सौ.रेश्माताई रेवणनाथ चोभे यांच्यासह संचालक दिलीप भालसिंग, संदिप कर्डीले, हरीभाऊ कर्डीले, संतोष म्हस्के, अभिलाष घिगे, बाबासाहेब खर्से, बाळासाहेब निमसे, संतोष कुलट, बन्सी कराळे, बबनराव आव्हाड, बाबासाहेब जाधव, कानिफनाथ कासार, रावसाहेब साठे, जगन्नाथ मगर, राजेंद्र बोथरा, वैशाली कोतकर, बहिरू कोतकर, शिवाजीराव कार्ले, वसंत सोनवणे, सचिव अभय भिसे यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post