महेंद्रसिंह धोनीला बीसीसीआयने करार यादीतून बगळलं
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- बीसीसीआयने गुरुवारी खेळाडूंची करार यादी जाहीर केली. यातून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला या यादीतून बाहेर काढले आहे. धोनीला मागच्या वर्षी ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. या वर्षी विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला बोर्डाने ए प्लस ग्रेडमध्ये ठेवले आहे. मागच्या वर्षीदेखील हे तीन खेळाडू ए प्लस ग्रेडमध्ये होते. यावर्षी बार्डाने 27 खेळाडूंसोबत करार केला आहे.
बीसीसीआयच्या कॉन्ट्रँक्ट लिस्टमध्ये पहिल्यांदा मयंक अग्रवाल, नवदीप सैनी, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदरला जागा मिळाली आहे. मयंकला ग्रेड बीमध्ये जागा मिळाली आहे तर इतर खेळाडू ग्रेड सीमध्ये आहेत.
2 खेळाडूंना प्रमोशन मिळाले
रिद्धिमान साहा आणि केएल राहुलला बोर्डाने प्रमोट केले आहे. राहुल मागच्या वर्षी ग्रेड बीमध्ये होता, यावेळेस त्याला ए ग्रेडमध्ये जागा मिळाली आहे तर साहाला ग्रेड सीमधून ग्रेड बीमध्ये जागा मिळाली आहे.
Post a Comment