अमेरिकी तळांवर इराणचा हल्ला; 80 सैनिक मारल्याचा दावा


माय अहमदनगर वेब टीम
​​​​​वॉशिंग्टन : इराणमध्ये बुधवार अत्यंत घडामोडींचा दिवस ठरला. इराणने आपले लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांच्या दफनविधीनंतर काही तासांतच अमेरिकेशी हिशेब चुकता करण्यासाठी इराकमधील दोन अमेरिकी तळांवर २२ क्षेपणास्त्रे डागली. यानंतर काही वेळात राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे एक विमान कोसळले. यात ९ क्रूंसह १७६ लोक मृत्युमुखी पडले. यानंतर काही तासांत इराणमध्ये भूकंपाचे दोन मोठे हादरेही बसले. दरम्यान, अमेरिकेने सुलेमानींवर हल्ल्यासाठी जी वेळ निवडली अगदी त्याच वेळी म्हणजे शुक्रवारी रात्री दीड वाजता इराणने हे हल्ले केले.

इराणने इराकच्या अनबार प्रांतात अमेरिकी हवाईदलाच्या तळांवर तसेच इरबिल तळावर बुधवारी पहाटे २२ क्षेपणास्त्रे डागली. हल्ल्यात ८० अमेरिकी सैनिक मारले गेल्याचा दावा इराणने केला. सुलेमानी त्यांच्या हत्येचा बदला म्हणून अमेरिकी तळांवर हल्ले केल्याचे इराणने म्हटले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑल इज वेल' असे ट्विट करत एकही सैनिक मारला गेला नसल्याचे म्हटले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी हा अमेरिकेला हादरा असल्याचे म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post