माय अहमदनगर वेब टीम - अजय देवगनचा आगामी चित्रपट 'मैदान'च्या स्टारकास्टमध्ये बदल झाले आहेत. मैदानमध्ये आधी दाक्षिणात्य अभिनत्री किर्ती सुरेशला घेण्यात आले होते, पण आता तिच्या जागी नॅशनल अवॉर्ड विनर दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणीला घेण्यात आले आहे. निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटात किर्तीला एका आईचे पात्र साकारायचे होते पण ती या पात्रासाठी खूप लहान दिसत होती. हा चित्रपट एक फुल ड्रामा चित्रपट आहे, जो माजी भारतीय कोच आणि मॅनेजर सैयद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित असेल.
या बदलाबाबत निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपट साइन केल्यानंतर आईचे पात्र साकारण्यासाठी किर्तीला आपले भरपूर वजन कमी करावे लागले होते. त्यानंतर एका दिवसाची शूटींग झाली आणि किर्ती आणि मेकर्स यांना समजले की, या पात्रासाठी किर्ती शोभून दिसत नाहीये. त्यानंतर दोघांच्या मर्जीने किर्तीने चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर प्रियामणीची निवड करण्यात आली.


Post a Comment