विंडीजची 27 महिने, सात सामन्यानंतर भारतावर मात; मालिकेत साधली बराेबरी



माय अहमदनगर वेब टीम
तिरुवनंतपुरम - सलामीवीर सिमन्सच्या (६७) नाबाद अर्धशतकाच्या बळावर विंडीज संघाने टी-२० मधील भारतीय संघाविरुद्धची आपली पराभवाची मालिका खंडीत केली. विंडीजने २७ महिने व सात सामन्यानंतर रविवारी यजमान भारतावर आठ गड्यांनी मात केली. यासह विंडीज संघाला तीन टी- २० सामन्याच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधता आली. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी मुंबईत हाेणार आहे.

भारतीय संघाने रविवारी प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७० धावा काढल्या हाेत्या.प्रत्युत्तरात विंडीज संघाने दाेन गड्यांच्या माेबदल्यात १८.३ षटकांत विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयात लेव्हिस (४०), हेटमेयर (२३) आणि निकाेलसने (नाबाद ३८) माेलाचे याेगदान दिलेे. त्यामुळे टीमला मालिका पराभव टाळता आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post