पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात स्वागत, मुख्यमंत्री ठाकरे अन् फडणवीस उपस्थित



माय अहमदनगर वेब टीम
पुणे -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री महोदय यांचे स्वागत केले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार संजय काकडे, आमदार सर्वश्री भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे तसेच मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, एअर कमोडोर राहूल भसीन, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, लेफ्टनंट जनरल दीपेंद्रसिंग आहुजा, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर, गणेश बिडकर आदी उपस्थित होते. देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post