माय अहमदनगर वेब टीम
लोणी - जेष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांच्या निधनान मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात आ.विखे पाटील यांनी म्हणले आहे की, डॉ.श्रीराम लागू यांनी रंगभूमीवरच्या आपल्या संपूर्ण वाटचालीत अभिनयातून आणि संवाद फेकीतून रसिकांच्या ह्रदयात अढळ असे स्थान निर्माण केले होते. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला एका उंचीवर नेवून ठेवणारे होते. त्यांनी नेहमीच आपली काही परखड मते आणि भूमिका समाजापुढे मांडल्याने डॉ.लागू यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण सदैव पहायला मिळाले.
पुणे येथे डॉ.लागू यांचा गौरव करण्यात आला. या महान कलावंताला सन्मातीत करण्याची संधी मला मिळाली हा क्षण माझ्या दृष्टीने स्मरणीय होता. या कार्यक्रमात त्यांच्याशी मला संवाद साधता आला. त्यांच्याशी झालेल्या गप्पातून या चौकस व्यक्तिमत्वाशी झालेली मैत्री अनमोल ठरली.
Post a Comment