माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : दादासाहेब जगताप निर्मित व सन इंडिया फिल्म यांच्यावतीने ‘बुधवार पेठ’ चित्रपटाचा शुभारंभ थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पुण्याच्या विजय थिएटरमध्ये पहिलाच शो हाऊसफुल्ल गर्दीत झळकला! ‘सैराट’फेम आर्चीचे पिताश्री व मुळशी पॅटर्नमधील निरीक्षक सुरेश विश्वकर्मा यांच्या हस्ते शुभारंभानिमित्त श्रीफळ वाढविण्यात आले. याप्रसंगी फॅशन डिझायनर स्वरदा जोशी यांचा फॅशन शो घेण्यात आला.
‘बुधवार पेठ’ शुभारंभास महापौर बाबासाहेब वाकळे, चित्रपटाचे दिग्दर्शक दादासाहेब जगताप, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, शैलेश चव्हाण, प्रोड्युसर संजय भोसले, श्याम बांदुगे, सहाय्यक दिग्दर्शक व कथाकार सुधाकर औघडे, स्वरदा जोशी, तेजश्री बडगुजर, काकासाहेब शिरोळे, कल्पना भावसार, दिनकर पंडित, के. सूरज, के. लक्ष्मण व चित्रपट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘बुधवार पेठ’ चित्रपटात सामाजिक विषय अतिशय संयमशीलतेने हाताळण्यात आला आहे. चित्रपटातील विषयाशी संबंधित समाजातील रिअॅलिटी दाखविण्याचा प्रयत्न निर्माते दादासाहेब जगताप यांनी केला आहे. समाजातील काही विषय कुठल्या थराला जातात याचे ज्वलंत उदाहरण या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. चित्रपटातील प्रसंगांचे चित्रीकरण पुणे, मुंबई, नगर येथे झाले आहे. चित्रपट मनोरंजनात्मक अंगाने सोप्या भाषेत प्रेक्षकांसमोर विषयाचे गांभीर्य विषद करतो, अशी माहिती दादासाहेब जगताप यांनी दिली.
‘बुधवार पेठ’च्या पहिल्याच शोमध्ये पुण्यातील प्रेक्षकांनी चित्रपटाचे संगीत व गाण्यांना उत्स्फूर्त दाद दिली. काही गाण्यांवर प्रेक्षकांनी शिट्ट्या वाजवून ठेका धरला व चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला. हा चित्रपट 3 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार असल्याची माहिती देण्यात आली.
‘बुधवार पेठ’ चित्रपटात विजय पाटकर व सीमा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्वरदा जोशी, प्रकाश धोत्रे, संग्राम सर, देशमुख, लक्ष्मण कांबळे, के. सूरज, शुभम मांढरे, अमोल टापरे, निखिल शहा, प्रिया चव्हाण, मधु टिळेकर, कृष्णा सांगळे, रुपेश शेलार, रश्मी अग्रवाल यांच्यासह नगरमधील अनिल भोसले, सुनील जगधने, तुषार सर, नन्नवरे व काका शिरोळे तसेच विशेष भूमिकेत राजेश नन्नवरे, स्वाती धाकटे, सुनील, झेबा शेख यांनी आयटम साँग साकारले. खलनायकाच्या भूमिकेत प्रकाश धोत्रे आहेत. चित्रपटाचे संगीत ‘शांताबाई’फेम संजय लोंढे यांचे आहे.
Post a Comment