‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. डान्स फ्लोरवर भारत-पाक यांच्यातील मुकाबला या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये त्याची एक छोटीशी झलक पाहायला मिळते.

वरून धवन श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे दिगदर्शन रेमो डिसूजा करत आहे. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. श्रद्धा व वरूणसोबत नोरा फतेही ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘

ट्रेलरमध्ये डान्सचा तडका आहे. नोरा फतेहीच्या किलर मुव्ह्स आहेत. शिवाय प्रभुदेवाच्या डान्सची झलकही आहे. वरूण व श्रद्धाची केमिस्ट्री नेहमीप्रमाणे मस्त जमून आली असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post