अधिवेशनही मातोश्रीवरच घ्या


माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - 'पक्षप्रमुख म्हणून भाषण देणे वेगळे आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून भाषण देणे वेगळे. मात्र, सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना त्याचा विसर पडला आहे. शिवाजी पार्कवर वा मातोश्रीवर शिवसेना आमदारांना उद्देशून केलेल्या भाषणासारखे ते बोलत आहेत', अशी टीका आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी विधिमंडळ  परिसरात केली.

राज्यपालांच्या अभिभाषणाणावर मुख्यमंत्री या नात्याने ठाकरे यांनी विधानसभेत निवेदन केले. विधिमंडळ परिसरात त्याचा टीकात्मक समाचार घेताना आमदार राणे म्हणाले, 'वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील मासेमारांपासून ते राज्यातील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या विधानाकडे डोळे लावून बसले होते. बुधवारी सदनातील काही नवआमदारांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सर्वांचे समाधान करण्याऐवजी राज्यातल्या शेतकऱ्यांनाही हरताळ फासला. मातोश्रीवर भाषण दिल्यासारखे ते बोलत होते. त्यामुळे शिवसेना आणि मित्रपक्षांचे पुढील विधिमंडळ अधिवेशन त्यांनी मातोश्रीवर बोलवावे. त्यांचे एकंदर भाषण हे प्रवचनी अंदाजातले होते. प्रवचने ही कानाला ऐकायला बरी वाटतात. मात्र, त्यातून प्रश्नांचे समाधान होत नाही', असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post