मुंबई - सरकारस्थापनेच्या पंधरा दिवसांनंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले होते. जयंत पाटील यांच्याकडे वित्त, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार, अन्न नागरी पुरवठा आणि कामगार खाती देण्यात आली होती. तर छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, उत्पादनात शुल्क, अन्न व औषध प्रशासन खात्याची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे.
जयंत पाटील यांच्याकडे आता जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते देण्यात आले आहे. तर छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण खाती देण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या खाते बदलाला मान्यता दिली आहे.
Post a Comment