वह्या निर्मिती एक लघुउद्योग
माय अहमदनगर वेब टीम
वह्या आणि मोठया रजिस्टर वह्यांची गरज आज मोठया प्रमाणात वाढली आहे. शाळा, महाविलद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे वह्यांच्या मागणीत आणखीच भर पडली आहे. वह्यांसाठी कच्चा माल व बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामानाने वह्या बनविण्यासाठी कमी तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. याशिवाय व्यापारी लोक वह्यांचा उपयोग रोजचा हिशोब लिहिण्यासाठी करतात.
उदयोग –
वह्यांच्या ठराविक साईज असतात. कागद खरेदी करून साध्या/सेमी अँटोमॅटीक यंत्रही वापरता येते. या यंत्रांमार्फत वेगवेगळया प्रकाराच्या व आकाराच्या वह्या जलदगतीने व मोठया प्रमाणात या वह्याची निर्मिती केली जाते. वह्या निर्मिती हा लघुउदयोगचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. हा उदयोग केल्यामुळे बेरोजगार युवकांना मोठया रोजगारांच्या संधी उपलब्ध होऊ शकते.
बाजारपेठ –
वह्यांचे प्रमुख ग्राहक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे सर्वत्र दिसून येते. सध्या विद्यार्थी व शाळा महाविद्यालयांचे प्रमाणात सुध्दा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यांची मागणी सुध्दा दररोज वाढत आहे. असल्यामुळे याला सर्वत्र बाजारपेठ तयार होत आहे.
प्रकल्पविषयक –
हा उदयोग उभारणीसाठी साधारण १५०० ते २००० स्के. फूट बांधकाम असलेली जागा लागते. तसेच थ्री फेजचे वीज कनेक्शन व गरजेनुसार लागते. या उदयोगासाठी साधारण ६ लोकांची आवश्यकता असते. तर हा उदयोग उभारणीसाठी ३ ते ५ लाख रूपये खर्च येतो.
Post a Comment