बिग बॉसने सलमानचे मानधन वाढवले!
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - लोकप्रिय शो बिग बॉस-१३ सध्या चर्चेत आहे. शोमध्ये खूप सारा मसाला पाहायला मिळाला. हेच कारण, आहे की, या शोने टीआरपीमध्येदेखील बाजी मारली.
सलमान खान शोली अलविदा म्हणू शकतो, असे म्हटले जात होत. त्यामुळे बिग बॉसचे चाहतेदेखील नाराज झाले होते. आता असे म्हटले जात आहे की, शोच्या निर्मात्यांनी सलमानच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिग बॉसमध्ये काहीतरी ट्विस्ट द्यायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शोची वेळदेखील वाढवण्यात आली आहे. दरम्यान, या शोची फिनालेची तारीखदेखील समोर आली आहे. हा शो तीन महिने सुरू राहणार होता. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, या शोचा कालावधी पाच आठवडे वाढवला आहे. बिग बॉसचा फिनाले १६ फेब्रुवारी, २०२० रोजी शूट केला जाणार आहे.
एकीकडे बिग बॉस-१३ चा कालावधी वाढवला जात आहे. तर दुसरीकडे, सलमान खान शो सोडणार असल्याच्या चर्चा आहे. रिपोर्टनुसार, सलमानचा जवळचा मित्र हा शो होस्ट करेल. सलमानचा आगामी चित्रपट 'राधे-योर मोस्ट वाँटेड भाई' चे शेड्यूल आधीपासूनच नियोजित आहे. तसेच स्टार्सच्या तारखादेखील निश्चित झाला आहे. त्यामुळे बिग बॉससाठी शूट करणं सलमानसाठी अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे सलमाननेच हा शो होस्ट करावा, यासाठी निर्मात्यांनी सलमानचे मानधन प्रतिदिवस २ कोटी वाढवले आहेत. संपूर्ण सीझनसाठी सलमान जवळपास २०० कोटी रुपये मानधन घेईल.
Post a Comment