31 डिसेंबरला झेडपीच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडी


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदाच्या पहिल्या टर्म चा कालावधी संपला आहे. आता दुसऱ्या टर्मसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घोषित केला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेली ही निवडणूक येत्या 31 डिसेंबर रोजी वर्षाअखेरीच्या दिवशी होणार आहे. महसूलच्या उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील सहायक निवडणूक निर्णय अधिकरी असून, सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण बसणार याचा फैसला होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेचे स्थान महत्वपूर्ण मानले जाते. पंचायत राज व्यवस्थेत महत्वाची संस्था म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकाऱ्यांची पहिली टर्म संपली आहे. पुढील टर्मसाठी ग्रामविकास विभागाने सोडतीद्वारे अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले. सध्या शालिनी विखे पाटील अध्यक्ष असून उपाध्यक्ष राजश्री घुले आहे. ग्रामविकासाच्या निर्देशानुसार आता जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम घोषित केला आहे. आज 21 डिसेंबर रोजी नोटीस जारी केली जाणार आहे. 31 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निगराणीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे.



असा आहे कार्यक्रम (31 डिसेंबर)

अर्ज दाखल करण्याची मुदत ः सकाळी 11 ते दुपारी 1

छाननी, माघार, निवडणूक ः दुपारी 3

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post