ठाकरे सरकारचे खातेवाटप जाहीर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- आज होईल, उद्या होईल ... कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर महाविकास आघाडीचे खातेवाटप जाहीर झाले आहे.

खातेवाटपानुसार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शपथविधी झालेल्या प्रत्येकी दोन मंत्र्यांकडे विविध खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह, नगरविकास, वन, पर्यावरण, पाणीपुरवठा जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे.

सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, उच्च तंत्रशिक्षण, कृषी, रोजगार हमी योजना, परिवहन खात्याची जबाबदारी असेल.


राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, उत्पादनात शुल्क, अन्न व औषध प्रशासन खाते देण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे जयंत पाटील यांच्यावर वित्त, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार, अन्न नागरी पुरवठा आणि कामगार या खात्यांची जबाबदारी असेल.

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जा, वैदकीय शिक्षण, शालेय शिक्षण आणि पदुम खाते आहे.

नितीन राऊत यांना सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून), आदिवासी महिला बालविकास, मदत व पुनर्वसन खाते देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त सर्व खाती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील..


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post