पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या 'तो' निर्णय राज्यातच झाला


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई : भाजपा नेत्या आणि माजी आमदार पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबात एक गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील काही उमेदवारांना आणि विद्यमान आमदारांना तिकिट नाकारण्यात आले होते. त्यावरून पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील काही उमेदवारांना तिकिट न देण्याचा तो निर्णय दिल्लीतून नाही तर राज्यातून घेण्यात आला होता, असे त्या म्हणाल्या.

आपली कोणत्याही पदासाठी पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची चर्चा नसल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने स्थापन केलेल्या सरकारवरही भाष्य केले.

विचारधारा मानणा-यांचे नुकसान झाले असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. आपण नव्या सरकारवर टीका करणार नाही. आम्ही सर्वानी यापूर्वीही एकत्र काम केले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाला जवळून पाहिले आहे. त्यांनी पक्षवाढीसाठी कायम प्रयत्न केले. जर कोणी दु:खात असेल तर त्याला ते पहिले जवळ करत असते असे म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post