' त्या ' विधेयकावरून राज्य सरकारची सावध भुमिका!
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - नागरिकता सुधारणा विधेयक संसदेने मंजूर केल्यानंतर आता त्यावरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षाचे नेते योग्य ती भुमिका घेतील अशी सावध प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. मात्र कॉंग्रेसचे मंत्री डॉ नितीन राउत यांनी मात्र या विधेयकाची राज्यात अंमलबजावणी करण्यास विरोध असल्याची भुमिका घेत मुख्यमंत्र्याना पत्र दिले आहे. कॉंग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील केंद्रीय नेत्यांची भुमिका कायते जाणून निर्णय घेवू असे म्हटले आहे.
राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र राज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदाने राहावे अशी पक्षाची भुमिका असून या विधेयकाला राज्यसभेत स्पष्टता नसल्याने विरोधाची भुमिका शिवसेने ने घेतल्याचे सांगत सावध पवित्रा घेतला आहे. येत्या विधीमंडळ अधिवेशनापूर्वी होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले.
Post a Comment