नगरमध्ये महाविकासआघाडीचे सूर जुळू लागले; आगामी निवडणुका एकत्रित लढणार!
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर ः राज्याच्या राजकारणात शिवसेना, राषट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या महाअघाडीने एकत्रीत येऊन जसे राजकारणाचे सूर जुळवले. याच धरतीवर जिल्हा व तालुकास्तरावर या तीनही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्यांनी सूर जुळवून घ्यायला सुरवात केली आहे. गत काळात या पक्षातून विस्तवही जात नसे. कायम वाद, हाणामारी, पळवापळवी असे. मात्र राज्यात या तीनही पक्षांनी एकत्रीतपणे महाअघाडीचे सरकार स्थापन केले, आणी स्थानिक स्थारावरील शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
अगामी स्थानीक स्वराज्य संस्थेसहीत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकांसाठी हे सर्व कार्यकर्ते एकत्रीत पणे चर्चा करू लागले आहेत.
रविवार ता. 8 रोजी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे यांनी नगर- पारनेर विधानसभेचे नवविर्वाचित अमदार निलेश लंके यांचा नगरच्या शिवसेना कार्यालयात सन्मानपूर्वक महाआघाडीच्या वतीने सत्कार केला. या वेळी कॉंग्रेसचे बाळासाहेब हराळ, जयंत वाघ, रविंद्र भापकर, राष्ट्रवादीचे तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेचे संदेश कार्ले, रामदास भोर, प्रवीण कोकाटे, संदिप गुंड, रांजेॅद्र भगत, नगरसेवक योगीराज गाडे, उद्योजक महेश गाडे, यांच्यासह नगर- पारनेर विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या ग्रामपंचायत सरपंच, सदस्य उपस्थीत होते. या वेळी अगामी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवजणूका एकत्रीत लडण्याची चर्चा झाली.
Post a Comment