नगरमध्ये पोलिसाच्या गळ्यावर चाकूने वार



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर शहरासह जिल्हा नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. स्वयंपाक घरातील चाकू हातात घेऊन बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. आज जिल्हा कारागृहात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

पावलस कचरू गायकवाड हे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सुजाता निवृत्ती शेळके उर्फ सुजाता गोपाल हाडवळे (वय 27 वर्षे, धंदा : नोकरी, नेमणूक : अहमदनगर जिल्हा कारागृह अहमदनगर) हे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सुजाता शेळके या कारागृहातील मेन गेट येथे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बंदोबस्ताला होत्या. न्यायाधीन बंदी क्रमांक 107/ 2019 आरोपी पावलस कचरू गायकवाड याने स्वयंपाक गृहातील चाकू घेतला. कारागृहातून पळून जाण्याच्या उद्देशाने शेळके यांचे डोक्याचे केस धरून गळ्यावर चाकूने वार केला. तो वार त्यांचे डाव्या हातावर झेलला असल्याने डाव्या हाताला दुखापत केली. कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post