श्रमसंस्कार शिबिरांमुळे युवक प्रगल्भ तर खेडी समृद्ध होतात - आ. निलेश लंके


सारोळा कासार येथे 'रासेयो'च्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- राष्ट्रनिर्मितीत युवकांचे महत्वाचे योगदान असते, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या नैतिक मूल्यांचा विकास होवून ते प्रगल्भ होतात तर त्यांच्या श्रमदानामुळे खेडी गावे पर्यावरण, जलसंधारणाच्या बाबतीत समृद्ध होत असतात, त्यामुळे आज अशा शिबिरांची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन आ. निलेश लंके यांनी केले.


नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्य कॉलेज अहमदनगर, जनता कला महाविद्यालय रुईछत्तीसी, राजर्षी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवरा, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ.लंके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष व माजी आ. नंदकुमार झावरे होते. तर यावेळी प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे, प्राचार्य डॉ.सुरेश बाबर, प्राचार्या स्वाती हापसे, माजी प्राचार्य विश्वासराव काळे, सारोळा विद्यालयाचे प्राचार्य सावकार शिंदे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, शिक्षकनेते संजय धामणे, माजी सभापती अशोक झरेकर, पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉ.ए.के.पंदरकर, प्रा.आर.जी.कोल्हे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आ. नंदकुमार झावरे म्हणाले, देशाची खरी जडणघडण ग्रामीण भागतच होत असते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिर ग्रामीण भागातच होत असल्याने ग्रामीण भागातील जीवनाशी विद्यार्थी समरस होत आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासास हातभार लागत असल्याने राष्ट्र उभारणीचे काम विशेष श्रमसंस्कार शिबिरातून होत असते.

प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे म्हणाले, सारोळा कासार गावाने लोकसहभागातून खूप मोठे जलसंधारणाचे काम उभे केले आहे. गेल्या ४ वर्षांत न्यू आर्ट्स महाविद्यालयालाही यामध्ये हातभार लावायची संधी मिळाली, या कामाची दखल केंद्र सरकारसह नॅक कमेटीने घेवून महाविद्यालयाचा गौरव केला त्यात सारोळागावाचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. भारती दानवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.निलेश लंगोटे यांनी केले. तर प्रा.बाळासाहेब फुलमाळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुका दुध संघाचे संचालक गोराभाऊ काळे, संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी, माजी सरपंच भानुदास धामणे, सोसायटीचे संचालक संजय काळे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव काळे, गजानन पुंड, शिलाताई कडूस, संजय पाटील बाळासाहेब धामणे, शहाजान तांबोळी, कार्यक्रम अधिकारी प्रा. मालुंजकर, प्रा.संदीप भणगे, प्रा.नम्रता ढूस, प्रा.मोनिका रणसिंग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post