माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महाराष्ट्रातील सर्वाधीक उंचीवर असलेले कळसूबाई शिखर राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर विभागाने सर केले आहे. अधीक्षक पराग नवलकर यांच्या नेतृत्वाखाली विभागातील सर्व डीव्हीजन्स व भरारी पथक यांचा समन्वय साधून जिल्हयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. आयुक्त प्राजक्ता लवंगारे आणि विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वाधीक उंचीवर असणारे शिखर असून ते १६४६ मीटर उंचीवर आहे. चढण्यास अवघड असलेल्या या सर्वोच्च शिखरावर राज्य उत्पादन शुल्कने आव्हानात्मक ट्रेक अधीक्षक श्री. नवलकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी केला. या साहसी ट्रेकमध्ये विभागातील सर्व डीव्हीजन्स व भरारी पथक यांचा समन्वय साधण्यात आला. जिल्हयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यामध्ये भाग घेतला. या ट्रेकमध्ये जिल्हयातील सर्व विभाग अ विभाग, ब विभाग, श्रीरामपूर विभाग. संगमनेर विभाग, कोपरगाव विभाग, भरारी पथक क्र. १ व भरारी पथक क्र. २ मधील निरीक्षक एस. आर. सराफ, यु. पी. बडे, बी. टी. घोरतळे, डी. एल. जगताप व १२ दुय्यम निरीक्षक जी. आर. चांदेकर, श्री. सुर्यवंशी, श्री. धोका, श्री. बारावकर, श्री. अहिरराव, श्री.कडभाने, श्री. कोंडे, श्री. बडदे, श्री. गोलेकर, श्री. पाटील, श्री. छत्रे, श्री. लिचडे तसेच मद्यनिर्माणी घटकातील ३ दुय्यम निरीक्षक श्री. भगत, श्रीमती वाघ, श्रीमती माने व सर्व जवानांसह ५८ जणांनी सहभाग नोंदविला.
कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेण्यात आली होती. मेडीकल सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. कळसुबाई शिखर चढल्यानंतर व उतरल्यानंतर स्ट्रेचींग व्यायामप्रकार करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर चढल्यावर सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. हे कठीण शिखर सर केल्यानंतर उर्जा मिळाल्यावर विभागास देण्यात आलेले महसुली उददीष्ट साध्य करण्याचा सर्वांनी विश्वास व्यक्त केला व विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या माहिमेबददल आभार व्यक्त करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क हा शासनाचा महसूल देणारा महत्वाचा विभाग असून राज्य शासनाच्या एकूण महसूलात मोठा वाटा आहे. या विभागातर्फे अवैध मद्यविक्रीवर गुन्हा अन्वेषण करुन नियंत्रण ठेवले जाते. कामाच्या व्यापामुळे व जिल्हयाची भौगोलिक परिस्थिती पाहता एकमेकांशी समन्वय साधण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
Post a Comment