'दबंग 3' ला आंदोलनाचा फटका ; पहिल्या दिवशी केली 24.50 कोटींची कमाई


माय अहमदनगर वेब टीम - सलमान खान स्टारर 'दबंग 3' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने सुमारे 24.50 कोटींची कमाई केली आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, जर देशभरात सीएए आणि एनआरसीविरोधात निदर्शने चालू नसती तर हा आकडा आणखी मोठा झाला असता.

व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांनी बॉलिवूड हंगामाशी केलेल्या बातचितमध्ये सांगितले की, निदर्शनांमुळे चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर 20-30 टक्क्यांनी परिणाम झाला आहे आणि जर प्रकरण लवकरच शांत झाले नाही तर चित्रपटाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.


वर्षातील पाचवा सर्वात मोठा ओपनर
'दबंग 3' बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात करुन वर्षाचा 5 वा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन स्टारर 'वॉर'ने पहिल्याच दिवशी 53.35 कोटी रुपयांची कमाई करुन या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. हा केवळ वर्षातील सर्वात मोठा ओपनर चित्रपट नव्हे तर बॉलिवूडमधील आजवरचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post