महिलांच्या गळ्यातील सोन्यावर डल्ला मारणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या






माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : शहरासह उपनगरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारी टोळी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीतील तिघांना ताब्यात घेतले तर एकजण पसार झाला.यांच्याकडून २ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजू रामय्या दास (रा.बुडई,स्वरा, जि.बालेसुर उडिसा, हल्ली रा.बोरूडेमळा भूतकरवाडी अ.नगर), रामा मधुकर खंडागळे (वय २१ वर्षे रा.वार्डनं.१ ,गोंधवणी रोड,अण्णाभाऊ साठे घुरकूल श्रीरामपूर), नयन राजेंद्र तांदळे (वय २५ वर्षे,रा.डावखर रोड,श्री फर्निचर शेजारी श्रीरामपूर),भूषण बबन ससे (रा.भूतकरवाडी, अहमदनगर) (पसार) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर असे की, मागील काही दिवसांपासून नगर शहरासह उपनगरांत दिवसाढवळ्या सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते.या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांत याबाबत गुरूवारी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलली. उपविभागीय पोलिस अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गर्दशनाखाली कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास आला असता. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ व या पथकातील पोलिस कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करत असताना, सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार राजू रामय्या दास (रा.बुडई,स्वरा बनगाव,बालेसुर उिउसा.हल्ली रा.बोरूडे मळा भूतकरवाडी), याने केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास वाघ यांना खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलिस निरीक्षक विकास वाघ, पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोना.शाहीद शेख, पोना.नितीन शिंदे, पोना.नितीन गाडे, पोना.मुकुंद दुधाळ, पोकॉ.शाहीद शेख, पोकॉ.संदीप थोरात, पोकॉ.भारत इंगळे, पोकॉ.राहूल शेळके, पोकॉ.सुजय हिवाळे यांच्या पथकाने भुतकरवाडीत छापा टाकून शिताफीन राजू रामय्या यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुह्याची कबुली दिली. तसेच त्याचे अन्य साथिदारांचीही नावे सांगितली. या आरोपींकडून ८८ हजारांचे ८ मोबाईल, ७५ हजारांची टिव्हीएस अपाची (एमएच१७ अेसी१०६०) तसेच १ लाख रूपये किमतीची बुलेट (एमएच १७ सीई७५३५) असा एकूण २ लाख ६३ हजारांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. या सर्वांवर कोतवाली, तोफखाना, भिंगार, सुपा, नगर तालुका, उल्हासनगर पोलिस ठाणे आदी ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे १४ गुन्हे दाखल आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post