आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

संग्रहित फोटो


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - आरे आंदोलनावेळी नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मेट्रोच्या कामाला स्थगिती दिलेली नाही, फक्त आरेमधील कारशेडमधील कामाला स्थगिती दिली असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. प्रस्तावित आरे कार शेडसाठी हजारो झाडांची कत्तल होणार असल्याने त्याला कडाडून विरोध होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आरे विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर मेट्रो प्रशासनाकडून एका रात्रीत जवळपास दोन हजारहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली होती.

या प्रकरणानंतर पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. यावेळी काही पर्यावरणप्रेमींविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. आता हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आरेचे काम बंद आहे. मेट्रोच्या कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाही. आरे कारशेडचा प्रश्न मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गिरगावमधल्या गिरगावकरांच्या घरांचा प्रश्न आहे. आरेमध्ये कारशेड बनवताना पर्यावरण नष्ट करायचे आणि एअर प्युरिफायर लावायचे याला अर्थ नाही. पर्यावरणाचा र्‍हास करून विकास माझ्या लेखी नाही. निरोगी आणि आनंदी आयुष्य जगता येईल असा विकास हे सरकार करेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post