भ्रष्टाचार : बीडीओंना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करा, अन्यथा उपोषण - जि.प. सदस्य
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रेंगडे यांनी स्वतः भ्रष्टाचार केला आहे. याची चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावेत, अन्यथा दि.१९ डिसेंबर पासून अमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदन जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई दराडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिले आहे.
अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांच्या मदतीने मोठा भ्रष्टाचार झालेला आहे.ते पुरावे जिल्हा परिषदेस दिले आहेत. सदर प्रकारणाची सखोल व पारदर्शी चौकशी होण्यासाठी गटविकास अधिकारी रेंगडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावेत. तसे न केल्यास पारदर्शी चौकशी होणार नाही, आणि भ्रष्टाचारचे पुरावे दडपले जातील. या कारणास्तव गटविकास अधिकारी रेंगडे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावेत. तसे न झाल्यास दि.१९ डिसेंबर पासून अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जि.प.सदस्या दराडे यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
Post a Comment