सत्तेसाठी महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला याबद्दलच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही-अजित पवार
माय नगर वेब टीम
बारामती-सत्तेसाठी महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला याबद्दलच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसून 145 च्या पुढे आकडा होत नाही, तोपर्यंत गोड बातमी येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर कोणत्याही पक्षातील आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फुटाफुट होणार नाही. पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय. असा चिमटा अजित पवारांनी उदयन राजे यांना काढला.
कर्नाटकचा निकाल काय लागला हे सर्व जनतेने पाहिले आहे. आमच्यापैकी तीन पैकी कोणत्याही पक्षाचे आमदार फोडले. तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पाडाव करतील. असे अजित पवार म्हणाले. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्य गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित होते सभेनंतर माध्यमांशी अजित बोलत होते.
अद्याप काहीही ठरलेलं नाही.याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत या वावड्याच.. आता 19 नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि पवारसाहेबांची भेट होईल. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल. असे अजित पवार म्हणाले.आज भाजपाकडे बहुमत असताना त्यांनी सत्ता स्थापन केली नाही.आम्ही विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्तेबाबत मार्ग काढता येतोय का याबद्दल सगळेच प्रयत्न करत आहेत. आमदारांचे संख्याबळ 145 च्या पुढे आकडा होत नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही. तोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवटीतच आपल्याला रहावं लागेल. असे वक्तव्य अजित पवारांनी केले.
Post a Comment