माय नगर वेब टीम
श्रीगोंदा - भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत कर्तव्य बजावणार्या राज्य महामार्ग पोलीस दलातील नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील हवालदार शहाजी भाऊराव हजारे (वय 47) यांचा मृत्यू झाला. काल रविवारी दुपारी नगर-सोलापूर रस्त्यावरील मांडवगण फाटा परिसरात हा अपघात झाला.
अपघातानंतर वाहनासह चालक पसार झाला. परंतु महामार्ग पोलिसांनी बाभळेश्वर जवळ त्याला पकडले. दि .17 रोजी सकाळी साडेसात वाजता वरिष्ठांच्या आदेशानुसार पो. ना. चालक शहाजी हजारे हे त्यांच्या सहकारी कर्मचार्यांसह मोबाईल पेट्रोलिंग करिता शासकीय वाहनाने नगर -सोलापूर रस्त्याने जात असताना शहाजी हजारे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण शिवारातील देवणारायण ढाब्यासमोर शासकीय वाहन थांबवून ते खाली उतरले. त्याचवेळी नगर सोलापूर रस्त्यावर सोलापूर कडून नगरच्या दिशेने भरधाव जाणार्या कंटेंनरने हजारे यांना जोराची धडक दिली. त्यात हजारे गंभीर जखमी झाले त्यांच्या सहकारी कर्मचार्यांनी तातडीने त्यांना नगर येथे उपचारासाठी आणले. पण उपचारादरम्यान हजारे यांचा मृत्यू झाला.
अपघात करून कंटेनर चालक पळून गेला होता. परंतु एका कर्मचार्याने सदर कंटेंनरचा क्रमांक लिहून घेतला होता. त्याचा शोध घेणे मुश्किल होते. परंतु श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो. कॉ. प्रकाश दंदाडे व साठे यांनी अपघातग्रस्त भागात चौकशी करून सदर कंटेनर चालकाचा मोबाईल क्रमांक एका ढाब्यावरून मिळवला त्यामुळे त्या मोबाईलच्या लोकेशनवरून सदर कंटेनर व चालकाला बाभळेश्वर येथे पकडून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हजारे यांच्या अपघाती मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे
Post a Comment