संत नामदेवांच्या वंशजासह दोन मृत्युमुखी




माय नगर वेब टीम
पुणे - पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या पायी पालखी साेहळ्यात ब्रेक फेल झालेला जेसीबी घुसल्याने दिंडीतील वारकरी, वाहने चिरडली गेली. पुण्याजवळील दिवे घाटात मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात दाेन वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज साेपान महाराज नामदास (३६) व अतुल महाराज आळशी (२४) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या दाेघांवर आळंदीत अंत्यसंस्कार होतील. ही माहिती प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिली. हडपसर येथील नोबेल रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. जेसीबीचा चालक निरंजनकुमार दास याला पाेलिसांनी अटक केली आहे. भाजपने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली.


कार्तिकी वारीसाठी आळंदीकडे निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या दिंडी साेहळ्यात ब्रेक फेल झालेला जेसीबी घुसल्याने दाेन जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास पुण्याजवळील दिवे घाटात हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज साेपान महाराज नामदास (३६) व अतुल महाराज आळशी (२४) यांचा समावेश आहे. ब्रेक निकामी झालेला जेसीबी घाटातील उतारावर आणू नकाेस, अशी सूचना वारकऱ्यांनी चालकाला केली हाेती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून त्याने जेसीबी दामटल्याने दाेन वारकऱ्यांच्या जिवावर बेतले. निष्काळजी जेसीबीचालक निरंजनकुमार दास (३२, मूळ रा. बिहार) याला पाेलिसांनी अटक केली आहे.
दरवर्षी कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरहून आळंदीला वारी निघते. त्यानुसार १२ नोव्हेंबर रोजी पौर्णिमेला दुपारी संत नामदेव महाराज पालखी दिंडी पंढरपूहून आळंदीकडे मार्गस्थ झाली. ही दिंडी २० नाेव्हेंबर राेजी आळंदीत दाखल हाेणे अपेक्षित हाेते. तेथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी साेहळ्यात हे वारकरी सहभागी हाेत असतात. त्यानुसार मजल दरमजल करत साेमवारी रात्री ही दिंडी सासवडला आली हाेती. तिथेच वारकऱ्यांनी मुक्काम केला व मंगळवारी सकाळी पुढील प्रवासासाठी पालखी निघाली हाेती. राज्यभरातील सुमारे एक ते दीड हजार वारकरी या दिंडीत सहभागी झालेले आहेत.
पुण्याजवळी दिवे घाटात सकाळी नऊच्या सुमारास वारकरी आले हाेते. घाट सुरू हाेण्यापूर्वी घाटमाथ्यावर सर्वजण चहापानासाठी थांबले होते. तेथून काही अंतरावरच एक जेसीबी एका दुचाकीला धडक देऊन थांबला होता. या अपघाताची माहिती घेतली असता या जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याचे वारकऱ्यांना कळले हाेते. त्यामुळे दिंडी पुढे जाईपर्यंत जेसीबी घाटात उतारावर आणू नकाेस, अशी विनंती वारकऱ्यांनी जेसीबीच्या चालकाला केली हाेती. त्याने ती एेकलीही. मात्र अर्धा तास थांबल्यानंतर चालकाने पुन्हा जेसीबी चालू केला व पुढे जाऊ लागला. घाटाचा उतार असल्यामुळे चालकाचे वाहनावर नियंत्रण राहिले नाही. जेसीबीचा वेग वाढला व त्याने एका रिक्षाला धडक दिली. काही क्षणांतच वारकऱ्यांच्या दिंडीत अनियंत्रित जेसीबी शिरला व काही जण या वाहनाखाली आले. त्यात २४ जण जखमी झाले तर दाेघांना आपले प्राण गमवावे लागले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post