डे-नाइट कसोटी: स्पिनर की फास्टर ? निवडीवर काथ्याकूट



माय नगर वेब टीम
नवी दिल्ली -  गुलाबी रंगाच्या चेंडूनं खेळण्यात येणाऱ्या पहिल्या डे-नाइट कसोटीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या कसोटी सामन्यासाठी खेळाडूंनी जय्यत तयारी केली असली तरी निवड समितीला संघ समतोलाच्या चिंतेनं ग्रासलं आहे. फिरकीला पोषक असलेल्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर नेमके किती वेगवान गोलंदाज खेळवायचे, असा प्रश्न निवड समितीला पडला आहे.

येत्या २२ नोव्हेंबरपासून बांगलादेश विरुद्ध भारत असा डे-नाइट कसोटी सामना रंगणार आहे. त्यामुळं संघात काही बदल करावे लागणार आहेत. त्यावरूनच सध्या काथ्याकूट सुरू आहे. इंदूरमधील कसोटी सामन्यात भारतीय संघानं तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज खेळवले होते. मात्र, त्या सामन्यात फिरकीपटूंची गरजच भासली नाही. वेगवान गोलंदाजांनीच सर्व सूत्रे हाती घेऊन पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. प्रकाश झोतातील सामन्यात गुलाबी चेंडू नेमका किती वळेल, याबद्दल साशंकता आहे. गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव असलेला झारखंडचा फिरकीपटू शाहबाज नदीमच्या मतानुसार, 'गुलाबी चेंडूनं गोलंदाजी करणाऱ्या फिरकीपटूंनी चेंडूच्या टर्नऐवजी अचूक टप्प्याकडं लक्ष केंद्रीत करायला हवं. एक लाइन पकडून गोलंदाजी केल्यास फिरकीपटूंना फायदा होऊ शकतो.'

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post