रिलायंस इंडस्ट्रीज 9.5 लाख कोटी रुपये मार्केट कॅप असलेली देशातील पहिली कंपनी बनली, दुसऱ्या नंबरवर टीसीएस
माय नगर वेब टीम
बिजनेस डेस्क - रिलायंस इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल(मार्केट कॅप) मंगळवारी 9.5 लाख कोटी रुपये झाला. इतके मोठे व्हॅल्यूएशन मिळवणारी रिलायंस देशातील पहिली कंपनी बनली आहे. मार्केट कॅपमध्ये दुसऱ्या नंबरवर टीसीएस आहे. त्याचे व्हॅल्यूएशन 7.91 लाख कोटी आहे.
व्हॅल्यूएशनमध्ये टॉप-5 कंपन्या
कंपनी मार्केट कॅप (रुपये)
रिलायंस इंडस्ट्रीज 9.55 लाख कोटी
टीसीएस 7.91 लाख कोटी
एचडीएफसी बँक 6.95 लाख कोटी
हिंदुस्तान यूनीलीव्हर 4.42 लाख कोटी
एचडीएफसी 3.82 लाख कोटी
रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मंगळवारी 3% वाढ झाली, यामुळे मार्केट कॅप वेगाने वाढला. रिलायंस मागील वर्षी ऑगस्टमध्ये 8 लाख कोटी रुपयांच्या आकड्यावर पोहचली. या बाबतीमध्येही रिलायंस देशातील पहिली कंपनी आहे.
Post a Comment