आता गुगलवर सर्च करणे अधिक सोप्पं होणार; जाणून घ्या सविस्तर
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )
गुगलवर काही गोष्टी सर्च करताना अनेकदा अस्पष्ट उच्चारामुळे गुगुलला माहिती अचूक मिळत नाही. त्यामुळे गुगलला इनपुट योग्य न मिळाल्याने अनेकांना गुगल वापरणे अवघड जात होते. यावर गुगलकडून गेल्या अनेक दिवसांपासून संशोधन सुरु होते. नुकतेच यावरची संशोधन चाचणी यशस्वी झाली असून नुकतंच गुगलने गुगल सर्चसाठी नवीन फिचर आणले आहे.
या फिचरसाठी गुगलने मशीन लर्निंगचा वापर केला आहे. या फिचरद्वारे तुम्हाला उच्चार कसा करायचा हे शिकवले जाणार आहे. या आधी गुगलमध्ये एखादा शब्द ऐकायला मिळायचा. पण त्याचा उच्चार कसा करायचा हे सांगितले जात नसायचे आता ते प्रत्यक्ष होताना दिसणार आहे.
आता गुगलचे ‘स्पीच रिकग्निशन टूल’ तुमच्या बोलल्या गेलेल्या शब्दांना प्रोसेस करेल. तुमचे उच्चार एक्सपर्ट्सच्या उच्चारांशी मॅच केले जातील आणि तुम्हाला योग्य उच्चार कसा करायचा हे शिकवलं जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करायचा याची या फिचरद्वारे पडताळणी केली जाते.
योग्य उच्चार कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी गुगलने ‘स्पीक नाऊ’ हे फिचर उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये एखादा शब्द उच्चारता येत नसेल, एखादा शब्द उच्चारताना तुम्ही अडखळत असाल तर गुगलवर तुम्हाला स्पीक नाऊचा पर्याय दिसेल.
तिथे माइक आयकॉनवर टॅप केल्यानंतर कठिण वाटणारा शब्द उच्चाराव लागेल यानंतर तुम्ही तो शब्द अचूक उच्चारला नाही तर गुगल तुम्हाला तो शब्द उच्चारण्यासाठी मदत करेल.
Post a Comment