क्रिती खरबंदा पुलकित सम्राटला करतेय डेट, स्वतः दिली कबुली, सलमान खानच्या बहिणीचा आहे एक्स-हसबंड
माय नगर वेब टीम
एंटरटेन्मेंट डेस्क - 'शादी में जरुर आना' आणि ‘हाऊसफुल्ल 4’ या चित्रपटांमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री क्रिती खरबंदा अभिनेता पुलकित सम्राटला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही काळात सुरु होत्या. या सर्व चर्चा खऱ्या असल्याचा खुलासा स्वत: क्रितीने केला आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपण पुलकितला डेट करत असल्याची माहिती दिली.
सर्वप्रथम आईवडिलांना सांगू इच्छित होती क्रिती...
मुलाखतीत क्रिती म्हणाली, आमच्या रिलेशनशिपविषयी प्रामाणिकपणे मला सर्वप्रथम माझ्या आईवडिलांना सांगायचे होते. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळेची गरज असते. कधी कधी एखाद्या गोष्टीला पाच वर्षे लागतात, तर कधी पाच महिने. आमच्या गोष्टीला पाच महिने पूर्ण झाले आहेत. माझ्या या नात्याविषयी आता कुणालाही सांगायला मला भीती वाटत नाही, याबद्दल मी समाधानी आहे.
Post a Comment