कॅलिफोर्नियामध्ये घरात फुटबॉल सामना पाहत असलेल्या 35 जणांवर अंधाधून गोळीबार, आशियातील 4 तरुणांचा मृत्यू




माय नगर वेब टीम
वॉशिंग्टन- अमेरीकेतील कॅलिफोर्नियामध्ये(रविवार) संध्याकाळी घराच्या पाठीमागे असलेल्या परसबागेत बसून फुटबॉल सामना पाहत असलेल्या 35 जणांवर अज्ञात हल्लेखोराने अंधाधून गोळीबार केला. या गोळीबारात आशियातील 4 तरुणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, एका स्थानिक व्यक्तीने फुटबॉल सामना पाहण्यासाठी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना आपल्या घरात बोलवले होते. घराच्या मागे असलेल्या परसबागेत 35 जण बसून फुटबॉल समाना पाहत होते. संध्याकाळी 6 वाजता एक एज्ञात हल्लेखोर आला आणि त्याने त्या सर्वांवर अंधाधून गोळीबार सुरू केला आणि पसार झाला. या गोळीबारात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने उपचारादरम्यान जीव सोडला. सध्या पोलिस सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post