राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत खुशी जाधवला ब्राँझ


प्रतिष्ठेच्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड
माय नगर वेब टीम

अहमदनगर - गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाची खेळाडू खुशी जाधव हीने दिल्ली येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत ब्राँझ पदक पटकाविले. तीची तीसर्‍या खेलो इंडिया या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खुशी जाधव हीने 17 वर्षा खालील वयोगटात सेमिफायनमध्ये हरियानाच्या खेळाडूला कडवी झुंज दिली. उत्तम खेळी करीत या स्पर्धेत तीने ब्राँझ पदक पर्यंन्त मजल मारली आहे. अहमदनगरची मेरी कोम म्हणून तीने आपली ओळख निर्माण केली आहे. जानेवारी महिन्यात आसामला होणार्‍या खेलो इंडिया या स्पर्धेत तीच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खुशी हीने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम, सचिव बाळकृष्ण सिद्दम, ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर, अरविंद चन्ना, मुख्याध्यापक रावसाहेब क्षेत्रे आदींसह पर्यवेक्षक, शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी तीचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post