माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यात क्यार वादळानंतर झालेल्या संततधार पावसाने मोठे नुकसान झाले. पण प्रशासनाने फक्त पीक नुकसानीचे पंचनामे केले पण फळबागांचे पंचनामे मात्र अद्यापही केलेले नाहीत. त्यामुळे फळबागांचे तातडीने पंचनामे करून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यानी पत्रकार पत्रकार परिषदेत केला.
यावेळी सभापती रामदास भोर, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संदेश कार्ले म्हणाले की नगर तालुक्यात क्यार वादळाच्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर चे नुकसान झाले. त्यात तालुक्यातील महत्वाचे आर्थिक पीक असणारे संत्रा आणि इतर फळबागा यांचे क्षेत्र साडेतीन हजार हेक्टर पेक्षा जास्त आहे. शासनाने १८ नोव्हेंबर रोजी अतिवृष्टी साठी हेक्टरी खरीप पिकांना ८ हजार आणि फळबागांना १८ हजार रुपये मदत जाहीर केली. पण नगर तालुक्यात मात्र कोणत्याही फळबागांचे पंचनामे झालेले नाहीत. प्रशासनाने हा दुटप्पी पणा सोडून देऊन फळबागांचेही पंचनामे करावेत व त्या शेतकऱ्यानाही मदत घ्यावी. तसेच पंचनामे करताना अद्यापही काही भागात पंचनामे झालेले नाहीत. प्रत्येक गावात पंचनामे करतानाही ठराविक पिकांचे पंचनामे केले तर काही पिकांचे केलेले नाहीत. प्रत्येक गावात वेगवेगळ्या पिकांचे पंचनामे का याचाही अर्थ लागत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्व पंचनामे पूर्ण करावेत, फळबागांचे पंचनामे प्राधान्याने करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे फळबागा आणि इतर कोणत्याही पिकांचे पंचनामे राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदार यांच्या नावे अर्ज आणि आपला सातबारा घेऊन तहसील कार्यालय नगर येते सकाळी १० वाजता जमावे. असे आवाहन तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment