माय नगर वेब टीम
अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान श्री विशाल गणेशास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस व्हावेत, असे साकडे घालण्यात आले होते. आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे केलेला नवस पुर्ण झाला आहे. श्री विशाल गणेशाची आरती करुन तो नवस फेडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे राज्यातील जनतेने भाजपाला जनादेश दिला; परंतु मित्र पक्षाच्या अडमुठ्या धोरणामुळे
सत्ता स्थापनेस विलंब होत होता, परंतु भाजपाच्या मुसद्दीनेतृत्वामुळे पुन्हा महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नगर येथे भाजपाच्यावतीने शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे महाआरती करण्यात आली. याप्रसंगी प्रा.मधुसूदन मुळे, भाजप प्रदेश कार्य.सदस्य अभय आगरकर, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, जगन्नाथ निंबाळकर, मिलिंद गंधे, धनंजय जामगांवकर, दामोदर बठेजा, प्रकाश सैंदर, सचिन पारखी, नितीन उदमले, महेश नामदे, मुकुल गंधे, दत्ता गाडळकर, अनिल गट्टाणी, अंकुश गोळे, मयुर बोचूघोळ, बाबा सानप, गणेश औसरकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अभय आगरकर म्हणाले, जनादेश असतांना सत्ता स्थापनेचे भिजत घोंगडे पडले होते. महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचे सरकार येणे गरजेचे होते. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांमुळे लोकांना भाजपाचे सर्वात जास्त उमेदवार निवडून दिले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र येत ही सत्ता स्थापन केली आहे. या अनुभवी नेत्यांच्या दुरदुष्टीने महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल, यात शंका
नाही.
यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने श्री विशाल गणेशाची आरती करुन, पेढे वाटण्यात आले. त्याचबरोबर फटाके फोडून, गुलाल उधळून व मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईलच्या घोषणांनी माळीवाडा परिसर दुमदुमून गेला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा होता.यावेळी सोमनाथ चिंतामणी,शाकिर सय्यद, विलास नंदी, भाऊ पानमळकर, महावीर कांकरिया, प्रकाश सोनी, शरद मुर्तडकर, विनोद भिंगारे, मनिष लोढा, पंडित वाघमारे, बाळासाहेब पाटोळे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment